गणेशाची विविध रूपे: भक्ती, तत्त्वज्ञान आणि कलात्मक वैभव

Known Connections

गणेशाची विविध रूपे: भक्ती, तत्त्वज्ञान आणि कलात्मक वैभव

Known Connections

Background


Introductory Memo

चिन्मयास्ता द्वितीयस्य निष्ककला शरीराम् उपासकानां कार्यार्थं ब्रह्मणो रूपकल्पना।

(अर्थ - भक्त किंवा साधक जे काही मिळवू इच्छितो, त्यासाठी ईश्वराला किंवा निर्गुण ब्रह्माला आपल्याला समजेल अशा रूपात किंवा मूर्तीत तयार करतात. )

गणपती हा देवता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता आहे. प्रत्येकजण त्याची पूजा आपल्या प्रिय स्वरूपात करतो. काही लोक त्याला गणपती म्हणतात, काही गजानन, काही गणेश आणि काही अगदी गणोबा असे हाक मारतात. हीच भावना दाखवते की गणपती प्रत्येकाच्या हृदयाजवळ असलेली देवता आहे. श्रीमंत वर्गापासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांसाठी तो जवळचा आणि प्रिय आहे. म्हणूनच त्याचे निरनिराळे रूप आणि विविध नावे तयार झाली आहेत.

मूर्तीशास्त्रज्ञ गो. बं. देगलूरकर सर यांनी विविध गणेश मूर्तींची ओळख जगाला करून दिली आहे. यातील काही मूर्तींचा परिचय करून घेऊयात.

1. Analytical View

गणेशाचे रूप सर्वांग सुंदर आणि अत्यंत आकर्षक आहे. इतर देवतांपेक्षा जरी तो वेगळा दिसत असला तरी तो सर्वांचा प्रिय आहे. तो मंगलमुर्ती आहे, सुखकर्ता आहे आणि दु:खहर्ता देखील, त्यामुळे भक्तांच्या जीवनातील प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणात त्याची उपस्थिती असतेच. त्याचे डोके हत्तीचे असून त्याचे कान सुपासारखे आहेत, जे त्याच्या रूपात एक वेगळ्या छटा आणतात. लांब सोंड, छोटे डोळे आणि विशाल पोट यामुळे त्याचे रूप अद्वितीय आणि लक्षवेधक बनते. या वैशिष्ट्यांमुळे गणेशाचे रूप केवळ भौतिकदृष्ट्या सुंदर नाही. त्यामध्ये आध्यात्मिक गूढ आणि भक्तांच्या मनात श्रद्धा, प्रीती आणि आत्मीयतेची भावना जागृत होते. प्रत्येक अंग, प्रत्येक रूपरेषा त्याच्या दिव्यता आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे, त्यामुळे तो सर्वसामान्यांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत प्रत्येकाच्या हृदयाजवळ अति प्रिय ठरतो. गणेशाची ही विशेषताच त्याला सर्वांचा आवडता आणि सर्वांग प्रिय देवता बनवते.

गाणपत्य संप्रदाय -

गाणपत्य संप्रदाय हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा संप्रदाय आहे. ज्यात गणपती हा प्रमुख उपास्य देवता मानला जातो. या संप्रदायाचे अनुयायी ‘गाणपत्य’ म्हणून ओळखले जातात. पाचव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान हा संप्रदाय उदयास आला असे रा. गो. भांडारकरांचे मत आहे. आठव्या आणि नवव्या शतकांतील कोरीव लेखांतही गाणपत्यांचा उल्लेख आढळतो, तसेच या काळात त्यांच्या सांप्रदायिक ग्रंथांची रचना झाली असावी. गणेशपुराण, ब्रह्मवैवर्तपुराणातील ‘गणेशखंड’, मुद्गलपुराण, गणपत्युपनिषद, गणेशसंहिता, गणेशगीता, गणेशकल्प, गणपतिरहस्य, गणेशसहस्रनाम आणि गणेशमाहात्म्य यात गणपतीबद्दल विविध माहिती मिळते.

गाणपत्य संप्रदायात सहा उपसंप्रदाय मानले जातात. महागणपती, हरिद्रागणपती, उच्छिष्टगणपती, नवनीतगणपती, स्वर्णगणपती आणि संतानगणपती. आनंदगिरीने शेवटच्या तीन उपसंप्रदायांची नावे नवनीत, स्वर्ण आणि संतानगणपती असे ठेवली असून त्यांचे प्राचीन पर्याय ऊर्ध्व, पिंगल आणि लक्ष्मीगणपती आहेत.

गणपतीची मूर्ती विविध प्रकारांनी तयार केली जाते. उभा, बसलेला, नृत्यावस्थेत, एकमुखी ते पंचमुखी, द्विभुज ते दशभुज, शक्तिसमवेत तसेच गणपरिवारासमवेत. भारताबाहेर पूर्वेकडील देशांतही त्याची उपासना आणि मूर्ती सापडतात. सर्व उपसंप्रदायांमध्ये एकमत आहे की गणपती सर्व देवांचे आणि सृष्टीचे आदिकारण आहे, अनादि-अनंत असून त्याच्या मायेने ब्रह्मादी सर्व देव आणि जग निर्माण झाले आहे. त्यामुळे गाणपत्य संप्रदायाचा इतिहास, उपासना पद्धती आणि ग्रंथीय परंपरा अत्यंत श्रीमंत आणि भक्तपरंपरेने समृद्ध आहे.

गणपतीची प्राचीन मूर्ती ही अफगाणिस्तानमध्ये अर्थात पूर्वीच्या गंधारप्रदेशात बघायला मिळते. या मूर्तीला महाविनायक म्हणून ओळखले जाते. आजही तिथे या मूर्ती बघायला मिळतात.

Ganesh idol displayed in cultural festival setting
Ganesh idol symbolizing prosperity and wisdom

नृत्य गणेश -

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वरांनी जे गणपतीचे वर्णन केले आहे त्याचे दृश्य स्वरूप नांदेड जिल्हातील देगलूर येथील होट्टल या गावातील मंदिरात बघयला मिळते. ओवीत सांगितल्याप्रमाणे ही मूर्ती बघायला मिळते. सहा दर्शनांप्रमाणे सहा हात त्याला आहेत. हातात विविध आयुध (शस्त्र ) धारण केली आहेत. त्याच्या एका हातात परशु आहे तसेच एका हातात मोदक आहे. हा ज्ञानाचा देव आहे. ही अतिशय दुर्मिळ अशी मूर्ती आहे.

Ganesh idol with festive decorations

षटमुखानन -

सहा तोंडाची गणेश मूर्ती ही अतिशय दुर्मिळ आहे. षटगुणांचे ते रूप आहे. सोबत त्याची शक्ती आहे. पायाशी उंदीर असतो. अशी मूर्ती पाटण येथे बघायला मिळते.

गणपतीच्या वाहनांवरून त्याची ओळख -

Artistic representation of Ganesh idol in Maharashtra
Traditional Lord Ganesha statue during festival
Lord Ganesh idol with traditional decorative elements

गणपतीच्या वाहनांवरून त्याची विविध अशी नावे तयार झाली आहेत. उंदरावर आरूढ झालेला गणेश. मोरावर आरूढ झालेला म्हणून मयुरेश्वर. आणि सिंहावर आरूढ झालेला हेरंब. उंदरावर आरूढ झालेली मूर्ती सर्वत्र पहायला मिळते. मोरावर आरूढ झालेली मूर्ती पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरात बघयला मिळते. हेरंब गणपती हा पाच तोंडाचा असतो.

बालगणेश रूपे -

गणपतीच्या बाललीला दाखवणाऱ्या विविध मूर्ती सुद्धा भक्तांनी तयार केल्या आहेत. बालकृष्णाप्रमाणे बालगणेशाची मूर्ती तयार केली आहे यात गणपती लोणी खाताना दिसत आहे. याशिवाय भाऊ कार्तिकेय याच्यासोबत खेळणारा, भांडण करणारा गणेश अशा मूर्ती देखील तयार केल्या आहेत.

Devotional Ganesh artwork with cultural symbolism
Ganesh idol crafted with intricate decorative details
Artistic idol of Ganesh in vibrant colors

यक्षविनायक -

Ganesh idol crafted with artistic cultural symbolism

यक्षविनायक हा वाराणसी येथे बघायला मिळतो. याच्या सोंडेवर हत्तींची रांग बघायला मिळते. याची पूजा केली जात नाही.

पंचविनायक-

Decorated Ganesh idol for Ganeshotsav
Ganesh idol reflecting devotional artistry

पंचविनायक याची ओळख नि. पु. जोशी यांनी करून दिली आहे. यात चार तोंड हे गणपतीची असतात आणि एक तोंड हत्तीचे असते.

उच्छिष्ट गणपती -

Ganesh idol reflecting Maharashtra’s festive tradition

उच्छिष्ट गणेश याची तांत्रिक पंथात पूजा केली जाते. या मूर्तीत गणपतीसोबत त्याची पत्नी किंवा शक्ती या दोघी किंवा दोघींपैकी एक असते. यात गणपतीची सोंड पत्नीच्या स्तनावर असते. या मूर्ती औढ्या नागनाथ आणि अंबरनाथ येथे बघायला मिळतात.

अशीच तांत्रिक पंथातील मूर्ती दशभुजा गणपती औढ्या नागनाथ येथे बघयला मिळते. यात गणपतीच्या खालच्या डाव्या हातात सिंधुरासुराचा वध केल्यावर त्याचे शीर आहे. ही अतिशय दुर्मिळ अशी मूर्ती आहे.

Ganesh idol showcased in devotional setting

कुंडलिनी गणेश -

कुंडलिनी गणेश यात गणपतीच्या पाठीवर वेणी दिसते. अथर्वशीर्षामध्ये गणपतीचे वर्णन

त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्ति त्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्।
त्वं शक्तित्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।

केले आहे. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्या योग अभ्यासात महत्त्वाच्या आहेत. या तिन्हीचा मेळ सुयोग्य पद्धतीने कुंडलिनी गणेशात दाखवला आहे. या मूर्तीत गणपतीच्या पाठीवर इडा, पिंगला आणि सुषुम्ना दृश्य स्वरूपात वेणी दाखवली आहे. शिल्प सहस्त्रदल या ग्रंथात नी. पु. जोशी यांनी या गणपतीच्या मूर्तीचे रेखाटन केले आहे. कल्याणमध्ये ही प्राचीन मूर्ती आहे. पण दुर्देवाने ही मूर्ती खंडित आहे.

Lord Ganesha idol in traditional artistic style
Ganesh idol with cultural elements in design

गणपती हा केवळ विघ्नहर्ता किंवा मंगलमुर्ती एवढाच मर्यादित नाही तो भारतीय / जागतिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अत्यंत गाभ्याशी जोडलेला भाग आहे. त्याच्या विविध रूपांतून आपल्याला भौतिक, दैवी आणि तांत्रिक अशा सर्व स्तरांवरील दर्शन घडते. नृत्यगणेशापासून कुंडलिनीगणेशापर्यंत, बाललीला ते उच्छिष्टगणेशापर्यंत त्याच्या प्रत्येक रूपात गूढ तत्त्वज्ञान, भक्तीभाव आणि कलात्मक वैभव सामावलेले आहे. ही विविध रूपे दर्शवतात की गणेशोपासना ही केवळ एका देवतेची पूजा नसून भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि कलावैभव यांचा संगम आहे. त्यामुळेच गणपती सर्वांना प्रिय असून, प्रत्येकाला आपल्या भावनेनुसार आणि श्रद्धेनुसार तो हृदयात स्थान देतो.

2. News at Glance
3. By The Numbers

जगभरातील गणेश मूर्ती — सांस्कृतिक पसराव (निवडक उदाहरणे)

क्र. देश विशेष माहिती
1 अफगाणिस्तान (गंधार) महाविनायकाची मूर्ती सापडते
2 नेपाळ अनेक शिल्पे व मंदिरे गणेशाला अर्पण
3 तिबेट बौद्ध परंपरेत गणेशाचे रूप
4 चीन बौद्ध कलाविश्वातील गणेश प्रतिमा
5 जपान कांगितेन नावाने पूज्य
6 कंबोडिया अंगकोर-वाटसह मंदिरे/शिल्पांत गणेश
7 थायलंड फ्रा पिक्कानेट म्हणून पूजला जातो
8 इंडोनेशिया (जावा, बाली) प्राचीन गणेशमूर्तींचे साक्ष्य
9 म्यानमार गणेश उपासनेचे पुरावे
10 व्हिएतनाम चंपा राजवटीतील अवशेष
11 श्रीलंका बौद्ध परंपरेसोबत गणेशपूजेचे पुरावे
4. Academic Insight
5. Social Media Pulse
6. On Our Reading List


Known Connections

Infopack

Show More

Individual

Show More

Organisation

Show More

Narratives

Show More

Activism

Show More

Propagation Medium Used

Show More
Show Connections