महाराष्ट्राच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील पुढील महत्वाचे केंद्र म्हणून नाशिकची वाटचाल

Known Connections

महाराष्ट्राच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील पुढील महत्वाचे केंद्र म्हणून नाशिकची वाटचाल

Known Connections

Background



Introductory Memo

नाशिक हे महाराष्ट्राच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उदयोन्मुख केंद्र म्हणून आकार घेत आहे. २०२३ मध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक महत्वाचे संरक्षण उपकरणे निर्माता असल्याकारणाने 'डिफेन्स हब' म्हणून स्थापित होण्याच्या या शहराच्या क्षमतेबद्दल माध्यमांशी चर्चा केली होती.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात नाशिक मधील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. किंबहुना संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नाशिक शहर व परिसरातील सुविधा लक्षात घेता नाशिकमध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित झाली नसेल तर नवल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने नुकताच नाशिक विमानतळावरील धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे व त्याकरिता २०० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे.

या नवीन धावपट्टीमुळे विमानतळाची क्षमता वाढणार आहे व २०२७ ला नाशिक शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होईल . हि गुंतवणूक नाशिकसाठीच्या एका मोठ्या आणि दीर्घकालीन विकास आराखड्याचा भाग आहे ज्यात अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत.

याचे वेगवेगळे टप्पे खालील प्रमाणे ;

1. News at Glance
2. Analytical View

नाशिक हे केवळ धार्मिक आणि कृषी महत्त्व असलेले शहर राहिले नसून आता ते संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत आहे. ओझर येथील नाशिक विमानतळ हे संरक्षण उत्पादन परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग असून, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने येथे नवीन धावपट्टी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यामुळे विमानतळाच्या क्षमता विस्तारास चालना मिळेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वाहतुकीच्या सुविधा सुधारण्यासोबतच या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या वाढीस नवी गती मिळेल. या वाढत्या अर्थव्यवस्थेचा आणि गुंतवणुकीच्या संधींचा सखोल आढावा या लेखात पाहूया;

नाशिक संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र होऊ शकते – नितीन गडकरी

मार्च २०२३ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढत्या संधींबाबत महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, "महाराष्ट्रातील नाशिक हे संरक्षण उपकरण निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र बनू शकते, कारण येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सारख्या कंपन्या कार्यरत आहेत."

भारतीय लष्कराच्या 'Know Your Army' या दोन दिवसांच्या शस्त्रास्त्र व उपकरण प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना गडकरी यांनी नागपूरमधील मल्टी-मोडल इंटरनॅशनल पॅसेंजर आणि कार्गो हब एअरपोर्ट (MIHAN) चा उल्लेख केला आणि सांगितले की, नाशिकमध्येही तसाच मोठा औद्योगिक विकास होण्याची क्षमता आहे.

मार्च २०२३ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकच्या संरक्षण उद्योगाच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, "नाशिकमध्ये HAL (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड) या सरकारी एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन कंपनीचा प्रकल्प आहे, तसेच देवळाली येथे इतर संरक्षण उत्पादन युनिट्स आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व घटकांमुळे नाशिकला संरक्षण उत्पादनाच्या मोठ्या संधी मिळणार आहेत."

गडकरी पुढे म्हणाले, "यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार निर्माण होतील, निर्यातीला चालना मिळेल आणि येथे तयार होणारी संरक्षण उपकरणे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतील."

नाशिक: भारताच्या लढाऊ विमान निर्मितीतील पुढील केंद्र

नाशिक हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एच. ए. एल) महत्त्वाच्या उत्पादन केंद्रांपैकी एक बनत आहे. एच. ए. एल येथे स्वदेशी हलकी लढाऊ विमाने (एल सी ए) एम के - १ ए, म्हणजेच 'तेजस', आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-४० (एच टी टी - ४०) या विमानांसाठी नवीन उत्पादन लाइन सक्रिय करत आहे. भारतीय हवाई दलाच्या (IAF) गरजा पूर्ण करण्यासाठी HAL नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमतांचा विस्तार करत आहे. HALच्या या नवीन उत्पादन प्रकल्पामुळे ८३ Mk-1A लढाऊ विमानांची डिलिव्हरी नियोजित वेळेपेक्षा एक वर्ष आधी होऊ शकते. याशिवाय, IAF ने ९७ अतिरिक्त Mk-1A विमाने खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यासाठी अंदाजे ₹६७,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

तसेच, ओझर येथील HAL विमानतळाच्या विस्तारासाठी २०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. समांतर नवीन धावपट्टी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी पडताळणी सुविधेमुळे नाशिकचे संरक्षण आणि विमाननिर्मिती उद्योग अधिक वेगाने विकसित होईल. हे पायाभूत बदल नाशिकला भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्राच्या केंद्रस्थानी आणणार आहेत.

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग

नाशिक हे महाराष्ट्राच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उदयोन्मुख केंद्र म्हणून आकार घेत आहे. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद यांसारख्या औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रांशी नाशिकचे वाढते संलग्नत्व राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. प्रस्तावित पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग या विकासाला अधिक चालना देणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

हा महामार्ग मुंबई, पुणे आणि नाशिक या सुवर्णत्रिकोणातील शहरांना वेगवान वाहतुकीने जोडत असून, पुढे तो गुजरातमधील औद्योगिक शहरांना, विशेषतः वडोदरा आणि अहमदाबाद यांसारख्या केंद्रांना सुलभ दळणवळण प्रदान करेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा महामार्ग राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर या शहरांच्या जवळून प्रस्तावित केला आहे, ज्यामुळे या भागातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

नाशिकच्या संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ही द्रुतगती जोडणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या महामार्गामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्राशी संबंधित मोठे उद्योग, संशोधन केंद्रे, आयटी हब आणि कृषी-औद्योगिक संकुले महामार्गालगत विकसित होऊ शकतील. परिणामी, स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊन, महाराष्ट्राचे संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत होईल.

नाशिक वाढवण हायवेमुळे नाशिक निर्यात राजधानी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरा आधी केलेल्या घोषणेनुसार, नाशिक-वाढवण हायवे हा नाशिकच्या औद्योगिक व निर्यात क्षमतेला एक नवा आयाम देणार आहे. वाढवण बंदर, जे जगातील सर्वात मोठ्या बंदरांमध्ये गणीला जाईल, त्याला थेट नाशिकशी जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरेल.

नाशिक आधीच एक औद्योगिक व कृषी उत्पादन केंद्र आहे, विशेषतः संरक्षण उत्पादन, वाईन उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाढवण बंदराशी थेट जोडले गेल्याने येथील संरक्षण संस्था परिसंस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याचा मार्ग अधिक सोयीस्कर होऊ शकेल. यामुळे नाशिक औद्योगिक हब म्हणून विकसित होण्याबरोबरच ‘निर्यात राजधानी’ म्हणून उदयास येईल.

हा महामार्ग संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठीही मोठा गेमचेंजर ठरू शकतो. सध्या नाशिक हे एच. ए. एल (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड) सारख्या संरक्षण उद्योगांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. पुणे आणि मुंबई येथील संरक्षण उत्पादन कंपन्यांशी आणि पुढे वडोदरा येथील उद्योगांशी नाशिकचा दळणवळण द्रुतगतीने होण्याची योजना आहे.

या जोडणीमुळे औद्योगिक व कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी अधिक वेगवान आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल. परिणामी, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. हा महामार्ग केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम भारताच्या औद्योगिक विकासाला गती देणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “नाशिक आत्मनिर्भर भारताचे डिफेन्स हब बनत आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य पहिले तर, नाशिक हे संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच. ए. एल) च्या सुविधांमुळे हे शहर लढाऊ विमानांचे उत्पादन आणि देखभालीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. एच. ए. एल नेच २०० हून अधिक सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमाने आणि डॉर्नियर-२२८ विमाने येथे तयार केली आहेत. शिवाय, या भागात संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स विकसित होत आहेत. पुणे आणि मुंबईमधील संरक्षण तळांशी आणि गुजरातमधील औद्योगिक क्षेत्रांशी द्रुतगती कनेक्टिव्हिटीमुळे नाशिक भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन स्वप्नात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

3. By The Numbers
 
 
 
 
 
 
 
 
 
4. Academic Insight
5. Social Media Pulse
6. On Our Reading List


Known Connections

Infopack

Show More

Individual

Show More

Organisation

Show More

Narratives

Show More

Activism

Show More

Propagation Medium Used

Show More
Show Connections