Background
Introductory Memo

يَسْأَلُونَكَ عَنِ الشَّهْرِ الْحَرَامِ قِتَالٍ فِيهِ ۖ قُلْ قِتَالٌ فِيهِ كَبِيرٌ ۖ وَصَدٌّ عَن سَبِيلِ اللَّـهِ وَكُفْرٌ بِهِ وَالْمَسْجِدِ الْحَرَامِ وَإِخْرَاجُ أَهْلِهِ مِنْهُ أَكْبَرُ عِندَ اللَّـهِ ۚ وَالْفِتْنَةُ أَكْبَرُ مِنَ الْقَتْلِ ۗ وَلَا يَزَالُونَ يُقَاتِلُونَكُمْ حَتّ يَرُدُّوكُمْ عَن دِينِكُمْ إِنِ اسْتَطَاعُوا ۚ وَمَن يَرْتَدِدْ مِنكُمْ عَن دِينِهِ فَيَمُتْ وَهُوَ كَافِرٌ فَأُولَـٰئِكَ حَبِطَتْ أَعْمَالُهُمْ فِي الدُّنْيَا وَالْآخِرَةِ ۖ وَأُولَـٰئِكَ أَصْحَابُ النَّارِ ۖ هُمْ فِيهَا خَالِدُونَ﴾ 217 ﴿
"पवित्र महिन्यात लढाई करणे मोठा अपराध आहे; परंतु अल्लाच्या मार्गात अडथळा आणणे, अल्लावर श्रद्धा न ठेवणे, मक्केच्या पवित्र उपासनागृहापासून (मुस्लिमांना) रोखणे आणि त्यांना तेथून हाकलून लावणे या गोष्टी अल्लाकरिता त्यापेक्षाही अधिक वाईट आहेत. कारण ठार मारण्यापेक्षा असा उपद्रव अधिक वाईट असतो. आणि ते तुमच्याशी तोपर्यंत लढतच राहतील, जोवर ते तुम्हाला तुमच्या (इस्लाम ) धर्मापासून दूर करणार नाहीत." (कुराण.2.217)
-अशा प्रकारे कुराणातील आज्ञेनेच पवित्र महिन्यातही लढण्यास परवानगी देण्यात आली.
पवित्र रमजानमध्ये मुस्लिमांनी लढलेल्या युद्धांची माहिती पुढीलप्रमाणे..
६२४ - बद्रचे युद्ध.

बद्रचे युद्ध रमजानच्या १७ व्या दिवशी लढले गेले.
रमजानच्या पवित्र महिन्यातील १७ व्या उपवासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचे कारण इस्लामसाठी पहिले रक्तरंजित युद्ध याच दिवशी लढले गेले.
प्रेषितांची म्हणजेच मोहम्मद पैगंबर साहेब यांची मोहीम म्हणजे जाने. ६२४ मधील बद्र या ठिकाणची. या ठिकाणी दूरगामी परिणाम करणारी लढाई झाली. त्यामुळे ही घटना इस्लामच्या इतिहासात फार प्रसिद्ध आहे. इतिहासकार इब्न इशाक (मृ.७६८) यांनी लिहिले आहे की : ''जेव्हा प्रेषितांना कळाले की. अबू सुफियान सिरियाकडून (परत) येतो आहे, तेव्हा त्यांनी आपल्या अनुयायांना बोलाविले नि सांगितले की, 'हा कुरैशांचा काफिला भरपूर वस्तू घेऊन येत आहे. जा, त्यावर हल्ला करा. कदाचित अल्लाह तुम्हाला श्रीमंत बनवील."
(२७-१३९:२१-१६४,१८- २१५ उद्) त्यात भाग घेणाऱ्या उरवा याने नंतर असे नोंदवून ठेवले आहे की, "प्रेषितांनी आम्हाला सांगितले होते की, या काफिल्यात फारच कमी लोक आहेत..... आम्ही (तीनशेजण) केवळ अबू सुफियान व त्यांचे सहकारी यांच्यावर हल्ला करण्याच्या विचाराने जात होतो व कुरैशांकडून लूट मिळविणे याशिवाय आमच्या डोक्यात इतर कोणताही अन्य विचार नव्हता. कोणती गंभीर लढाई होणार, हे आम्ही अपेक्षिलेले नव्हते. " (२१- १६४) या काफिल्यात ७० व्यापारी होते. त्यांना ३०-४० जणांच्या पथकाचे संरक्षण होते. (११७-१२७) स्वतः प्रेषितांच्या नेतृत्वाखाली ३१३ जण मोहिमेवर निघाले. (१७-१०६) दोन घोडे व ७० उंट बरोबर घेतले होते. (२०-२५३)

काफिल्यावर हल्ले करण्यासाठी काही लोक लुटीच्या हेतूने कसे येत व प्रेषित त्यांना सोबत येण्यासाठी श्रद्धावान बनविण्यासाठी अट कशी घालत याचे एक उदाहरण येथे देता येईल. लढाईला जाताना त्यामध्ये श्रद्धाहीनांचा समावेश केला जात नसे, कारण लढाई ही मूलतः श्रद्धाहीनांविरुद्ध होती. या मोहिमेत दोन बिगर-मुस्लिम सामील झाले होते. शहराबाहेर आल्यावर सैन्याचे निरीक्षण करताना प्रेषितांना ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्यांनी त्या दोघा श्रद्धाहीनांना विचारले : "तुम्हाला आमच्याबरोबर यायला कुणी सांगितले?" त्यांनी उत्तर दिले की, "तुम्ही आमचे नातलग आहात. आमच्या शहराने तुम्हाला संरक्षण दिलेले आहे. आम्ही आमच्या लोकांसोबत लुटीच्या आशेने आलेलो आहोत." यावर प्रेषितांनी सांगितले की, "आमच्या धर्माचा असल्याशिवाय अन्य कोणीही आमच्या सोबत येऊ शकत नाही.' ते म्हणाले, "आम्ही मोठे शूर योद्धे आहोत. आम्ही तुमच्या बाजूने मोठ्या शौर्याने लढू. लुटीतील आमच्या वाट्याशिवाय आम्हाला अन्य काहीही नको." परंतु प्रेषितांनी यास नकार देऊन सांगितले की, "तुम्ही असे करू शकणार नाही. आधी इस्लामचा स्वीकार करा नि मगच लढा!" शेवटी त्या दोघांनी इस्लामचा स्वीकार केला. त्यानंतर प्रेषितांनी त्यांना अनुज्ञा दिली "आता चला (आमच्याबरोबर) आणि लढा.' (१८-२१५: २०४-१७०): (पुढे - ६२२, हदीस क्र. १०)त्यांचे लक्ष्य बद्र हे मोक्याचे ठिकाण होते. ते मदिनेपासून १२० कि.मी. तर मक्केपासून ३०० कि.मी. अंतरावर महामार्गावर होते. परंतु दुर्दैवाने अबू सुफियान यांस या मोहिमेचा सुगावा लागला. लगेच त्यांनी संरक्षणासाठी कुमक पाठविण्याचा मक्केस निरोप पाठविला. त्यानुसार आपल्या मालाच्या व काफिल्याच्या संरक्षणासाठी मक्केहून ९५० जण निघाले. त्यात ७०० उंट व १०० घोडे होते. (११७-१२७, २१-१६६) ती मदत येण्याच्या पूर्वीच प्रेषितांच्या सैन्याला व हल्ल्याला चुकवून दुसऱ्या मार्गाने सुफियान यांचा व्यापारी काफिला मक्केच्या मार्गास लागला. (२१-१६५) मक्केस सुखरूप जाऊन पोहचला. (२८-३२) परंतु मक्केहून आलेल्या सैनिकी काफिल्याने प्रेषितांच्या सैन्याशी मुकाबला करण्याचे ठरविले. अबू जहल हा त्यांचा नेता होता. निःशस्त्र व्यापारी काफिल्यावर हल्ला करायचा म्हणून प्रेषितांचे सैन्य गेले होते, पण आता त्यांच्यासमोर खास लढण्यासाठी आलेले आपल्यापेक्षा तिप्पट सैन्य उभे टाकले. प्रेषितांना व्यापारी काफिला निघून गेल्याची कल्पना नव्हती. ते त्यावर हल्ला करण्यासाठी आले होते व त्याच्या प्रतीक्षेत विशिष्ट ठिकाणी थांबले होते. (२३-१३८) मक्केवरून खास सैन्य येत आहे याचीही त्यांना फार पूर्वी कल्पना नव्हती. (३४-७४) हे नवे आव्हान अनपेक्षित व अचानक समोर उभे टाकले होते.
या संकटाशी निर्धारपूर्वक तोंड देण्याचे प्रेषितांनी ठरविले. पण त्यांच्यासमोर एक अडचण उभी टाकली. ती ही की, सोबत आलेल्या मदिनेतील मुस्लिमांनी घेतलेली प्रतिज्ञा किंवा केलेला करार आक्रमण करण्यासाठी किंवा मदिनेबाहेर युद्ध करण्यासाठी नव्हता. प्रेषितांनी त्यांच्यासमोर चित्र स्पष्ट केले की, 'अल्लाने त्यांना दोन पर्याय दिलेले आहेत : एक. (उत्तरेकडून) येणाऱ्या व्यापारी काफिल्यावर हल्ला करण्याचा व दुसरा, (दक्षिणेकडून) येणाऱ्या सैनिकी काफिल्यावर हल्ला करण्याचा ' (११७- १२९:१६७- २२१): (पुढे - ४२५(i)) यांपैकी कोणता पर्याय स्वीकारणार असे विचारता त्यांनी सैनिकी काफिल्याबरोबर लढण्यास संमती दिली. (२०-२५७); (१०७-२०१) मग प्रेषितांनी अल्लाला प्रार्थना केली :‘हे अल्लाह! अबू जहल निसटून जाऊ नये.' (१८-२२०) त्यांनी लढण्यासाठी सोयीची विशिष्ट जागा निवडली. (२१-१६८) लढाईस सुरुवात झाली. प्रेषितांचे सैन्य कमी असले तरी अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध होते. कुरैशांच्या सैन्यात एकमत नव्हते. शिस्तीचा अभाव होता. त्या काळातील नियमानुसार आरंभाला एक-एक योद्ध्याची वैयक्तिक लढाई सुरू झाली. त्यात मुस्लिम योद्ध्यांचा विजय होऊ लागला. मक्केचे अनेक मूर्तिपूजक योद्धे गारद झाले. (१६६) त्यातच पाऊस पडल्याने जमीन कठीण झाली होती. त्याचा लाभ जलद गतीने हालचाल करणाऱ्या प्रेषितांच्या सैन्याला मिळाला. प्रत्यक्षात (सामूहिक) युद्धाला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली. शत्रूचे सैन्य पश्चिम बाजूने होते व सकाळचे सूर्याचे किरण त्यांच्या डोक्यावर पडत होते. शत्रूकडे खूप उंट व घोडे होते, पण त्यांना कार्यक्षमतेने त्यांचा उपयोग करून घेता येत नव्हता.

प्रेषित मागे तंबूत थांबून नेमके आदेश देत होते; सैन्याला उत्तेजित करीत होते. (१६६) त्यांनी मोठ्याने अल्लाचा धावा केला : 'हे अल्लाह! येथे है कुरैश आहेत. आपल्या खोट्या बडेजावात ते तुझ्या प्रेषिताला खोटे ठरवित आहेत है अल्लाह! आम्हाला मदत व विजय देण्याचे तुझे वचन विसरू नकोस. हे अल्लाह! जर है (मुस्लिम) सैन्य नष्ट झाले तर, मूर्तिपूजेचे वर्चस्व होईल आणि केवळ तुझीच निर्भेळ उपासना पृथ्वीवरून संपून जाईल." (११७-१३२: २३-१३८, १६७-२२६); (पुढे - ५९४ हदीस क्र. ७) ते वादळाचे दिवस होते. अचानक वादळ उठले. तिकडे प्रेषितांनी गर्जना केली: 'हे पहा! जिब्रिइल हजार देवदूत घेऊन शत्रूवर चालून आला आहे !' (१८-२२६) आणि दुसरे वादळ उठले. युद्ध जोरात सुरू होते. प्रेषितांनी विशिष्ट क्षणी हातात वाळू घेतली व शत्रूवर उधळीत ते मोठ्याने ओरडले : 'तुमचे चेहरे गोंधळून जावो! ' आणि काय आश्चर्य!'
शत्रू सैन्यात गोंधळ उडाला. विजयी होण्याच्या मार्गावर असलेले ते सैन्य मागे हटू लागले. मुस्लिम सैन्य अधिक प्रेरित होऊन त्वेषाने लढू लागले. शत्रूचे सैन्य पुरते घाबरले. त्यांचा पराभव झाला. प्रेषितांचा विजय झाला. त्यांनी आपल्यापेक्षा तिप्पट सैन्याला पराभूत केले. शत्रूचे ७० ठार झाले, ७० कैदी करण्यात आले. २५ (३९-६१२) मुस्लिम सैन्यातील फक्त १४ ठार झाले. शत्रूचा प्रमुख अबू जहल ठार मारला गेला. 'अबू जहल' यास इस्लामच्या इतिहासात 'अज्ञानाचे बाप' (Father of Ignorance) म्हणतात. त्याचे मुंडके कापून प्रेषितांपुढे आणण्यात आले. तो अज्ञानाचा, ज्ञानाच्या शत्रूचा शिरच्छेद होता. प्रेषितांना म्हणावे लागले : 'हे अल्लाच्या शत्रूचे शिर आहे. अल्लाह हा एकच आहे, त्याशिवाय अन्य कुणीही (ईश्वर) नाही.' (१८-२२७)
मुस्लिम मनाचा शोध-शेषराव मोरे यांच्या पुस्तकातून (पुष्ठ क्र.150)
६२७ - खंदकाची लढाई.

खंदकाची लढाई. मुस्लिमांनी पवित्र रमजानच्या दरम्यान या लढाईसाठी तयारी सुरु केली,
प्रेषित हे मक्केच्या जवळपास येऊन निर्णायक विजय मिळवू लागले आहेत हे मक्कावाल्यांच्या लक्षात आले. अरबस्थानच्या विविध भागात चाललेल्या प्रेषितांच्या अशा मोहिमांमुळे व त्यांचे राजकीय ध्येय लक्षात आल्यामुळे मक्कावाले व अशा विरोधी टोळ्या एकत्र येऊन मदिनेविरुद्ध चढाई करण्याचा विचार करू लागल्या. फेब्रु. ६२७ मध्ये या योजनेला मूर्तस्वरूप देण्यात आले.
मक्केच्या कुरैशांनी आपल्या नेतृत्वाखाली अनेक टोळ्यांची युती केली. सिरियाच्या वाटेवरील खैबर येथे ज्यू जमातीची मोठी वस्ती होती. मदिनेतून हद्दपार केले गेलेले ज्यूही (कैनुका, नजीर इ.) तेथेच जाऊन राहिले होते. खैबरच्या ज्यू टोळ्याही यात सहभागी झाल्या. सैन्यांची एकूण संख्या १० हजार झाली होती. त्यात मकावाल्यांचे ४ हजार तर उर्वरित इतर टोळ्यांचे होते. सेनापती अबू सुफियान यांच्या नेतृत्वाखाली हे सैन्य मदिनेकडे निघाले. (२८-६२)
प्रेषितांना या आक्रमणाची बातमी मिळालेलीच होती. त्यांनी मदिनेच्या संरक्षणाची व्यूहरचना केली. उहूदप्रमाणे शहराबाहेर पडून धोका पत्करण्याऐवजी मदिना शहराभोवती राहून संरक्षण करण्याचे ठरले. (६४) सलमान नावाच्या एका मूळ पर्शियन असलेल्या व येथे येऊन मुस्लिम झालेल्या पर्शियन युद्धपद्धतीच्या माहीतगाराने मदिनेभोवती संरक्षक खंदक खोदण्याची कल्पना मांडली, असे इतिहासकार सांगतात. ( १९-१८२: २१-२०९) परंतु अशी प्रत्येक गोष्ट अल्लाच्या मार्गदर्शनानुसार होत असल्यामुळे प्रेषितांनी म्हटले आहे की, 'ही कल्पना मला अल्लाकडून मिळाली.' (२८-६५) त्यानुसार खंदक खोदण्याचे काम तीन आठवड्यांत मदिनेच्या नागरिकांनी पूर्ण केले. या खंदकाची लांबी साडे पाच कि. मी. होती. (२८-६८: १०६ - १७२) उत्कृष्ट घोडासुद्धा वरून उडी मारू नये इतका तो रुंद होता. त्याची रुंदी ३० फूट व खोली १५ फूट होती. खदकाला ठिकठिकाणी संरक्षित मार्ग होते. (२८-६८: १०६-१७२) हे काम पूर्ण होईपर्यंत प्रेषित तेथे एका तंबूत बसून होते. ते अनेकदा स्वतःही काम करीत. एक मोठा व कठीण खडक कोणालाच फुटेना. तो त्यांनी तीन घावांत फोडून दिला. (२८-७०)

पहिला घाव घातला तेव्हा ते म्हणाले : 'आपण यमन (दक्षिण अरबस्थानातील एक भाग) जिंकलेला आहे.' दुसऱ्या घावानंतर ते म्हणाले : 'आपण सिरिया जिंकले आहे.' आणि तिसऱ्या घावानंतर ते म्हणाले : 'आपण इराण जिंकले आहे. ' ४८ (१०६-१७६) खंदकाची ही मापे लक्षात घेतली तर हे काम किती प्रचंड होते हे लक्षात येते. हे काम पूर्ण करण्यासाठीची उपकरणे बनी कुरैझा या ( मदिनेत शिल्लक राहिलेल्या तिसऱ्या व शेवटच्या) ज्यू टोळीकडून आणलेली होती. (२८-७१) या टोळीने खंदक खोदण्यातसुद्धा मदत केलेली होती. (२१-२०९) शत्रू येण्यापूर्वीच खंदकाचे काम पूर्ण झाले होते. प्रेषितांचे संरक्षक सैन्य ३ हजार होते. ते शहर व खंदक यांच्या दरम्यान उभे करण्यात आले होते. खंदकाबाहेरील शहर भागातील नागरिकांना खंदकाच्या आत हलविण्यात आले होते. (१७-१३४, १८-३०७ : २८-७३) या खंदकामुळे या ठिकाणी झालेल्या युद्धाला 'खंदक युद्ध' असे म्हणतात.
मदिना शहराच्या उपनगरात बनी कुरैझा ही ज्यू टोळी राहात असे. या युद्धात त्या टोळीचे प्रेषितांशी वा शत्रूशी कसे संबंध होते हा फार महत्त्वाचा प्रश्न ठरलेला आहे. यासंबंधात परस्परविरोधी मते आढळतात. काहीजणांचे म्हणणे असे की, मक्केच्या अबू सुफियान यांनी या टोळीशी गुप्तपणे संधान बांधून प्रेषितांपासून तोडले होते. (८-७८) हे कळल्यावर प्रेषितांनी त्यांच्याकडे (मुद्दाम) निरोप पाठवून मदतीचे आवाहन केले. परंतु त्या टोळीप्रमुखांनी त्यांना आव्हानात्मक उत्तर दिले की : "मुहंमद कोण आहे? आणि अल्लाचा प्रेषित कोण आहे, की ज्यांची आम्ही आज्ञा पाळावी? त्यांच्यात व आमच्यात कोणताही करार व वचननामा नाही." (८-७८) या संबंधात स्प्रेंगलर यांचे म्हणणे असे की, येथे दोन शक्यता आहेत: एक, उहूदच्या युद्धात बनी कुरैझा या टोळीला (व ज्यूंना) युद्धात भाग घेण्यास प्रतिबंध केलेला होता. त्यामुळे खंदक युद्धातही प्रेषितांनीच त्यांना सहभागी करून घेतले नसावे. दोन, या टोळीने स्वतः होऊन तटस्थतेची भूमिका घेतली असावी. त्यांच्या मते यांपैकी पहिली शक्यता अधिक बरोबर आहे. (१८-३१०उद्) अर्थात, या टोळीने कोणाकडूनही या युद्धात भाग घेतलेला नव्हता वा कोणती उघड कृती केली नव्हती आणि म्हणूनच अशा शक्यता वर्तविण्यात येतात.
मुस्लिम सैन्याला खंदकाचे रात्रंदिवस रक्षण करावे लागे. शत्रूनी खंदक ओलांडण्याचे एक-दोन प्रयत्न केले. काही चकमकी झाल्या. खंदकापलीकडून बाणांचा मारा भरपूर झाला. (२१-२०९) मात्र, शत्रूला खंदक कधीही ओलांडता आला नाही. शत्रूचा वेढा २१ दिवस चालला. त्यांचा अन्नसाठा संपत आला. निसर्गानेही त्यांच्यावर अवकृपा केली. गारठून टाकणारी थंडी तर होतीच, पण पाऊस आणि वाऱ्याने उघड्यावरील शत्रूच्या लष्करी तळाला तीन दिवस झोडपून काढले. चक्री वादळाने त्यांचे प्रचंड नुकसान केले. तंबू उडून गेले.स्वयंपाकाच्या वस्तू उडून गेल्या. (२३-२९९) शिवाय, बनी कुरैझा या ज्यू टोळीत व शत्रुपक्षात परस्परभीती निर्माण करण्यात प्रेषित यशस्वी झालेले होते. शेवटी, अबू सुफियान यांनी माघार घेण्याचे ठरविले. असे सांगतात की, परत जाताना ते उंटावर बसले व त्याला उठवू लागले; पण त्यांनी लक्षच केले नाही की त्या उंटाचे पाय दोरीने बांधलेले आहेत. (२८-७८) शत्रू पळून गेला. (बद्रप्रमाणेच) तीन- चार पट सैन्यावर प्रेषितांना विजय मिळाला. एकूण लढाईत मुस्लिमांकडील सात तर शत्रू कडील चारजण ठार झाले होते. (१०८-२४३) अरबस्थानात आता प्रेषितांचा, म्हणजे मुस्लिम राज्याचा, पराभव करणे शक्य नाही हे या खंदक युद्धाने सर्वांना कळून चुकले. (२१-२११)
प्रेषितांनी तर उघडपणे या विजयाचे श्रेय अल्लालाच दिले. युद्धपूर्व काही दिवसांपासून ते प्रार्थना करीत होते : "हे अल्लाह ! शिक्षा करण्यास तू फार तत्पर आहेस. शत्रूला लढण्यासाठी तयार कर. लढाई होऊ दे. त्यांचा थरकाप उडव (१७-१४०) " त्यांनी युद्धानंतर सांगितले की, "ही प्रार्थना ऐकूनच अल्लाने शत्रूवर प्रचंड वादळ पाठविले होते. स्वर्गातील (देवदूतांचे) सैन्य आमच्या बाजूला येऊन लढत होते. शत्रूच्या हृदयात (अल्लानेच) थरकाप निर्माण केला होता.'' (१७-१४१) यासंबंधी कुराणात म्हटले आहे : "हे श्रद्धावानांनो! लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याविरुद्ध शत्रूचे सैन्य येते तेव्हा अल्लाह मदत करीत असतो. आम्ही (अल्लाह) त्यांच्याविरुद्ध वादळ व तुम्हाला दिसत नाही असे सैन्य पाठवितो.'' (३३:९) ’अल्लाने त्या श्रद्धाहीनांना असे परावृत्त केले की, (त्यामुळे) ते संतापले होते. त्यांना काहीच लाभ झाला नाही. अल्लाह श्रद्धावानांतर्फे लढण्यास पुरेसा झाला. (त्यांना लढण्याची गरजच पडू दिली नाही). (३३:२५): (१७-१४१,१०६- १७५:१०८-२४१)
-मुस्लिम मनाचा शोध-शेषराव मोरे यांच्या पुस्तकातून (पुष्ठ क्र.१८१)
६३० -हुनैनची लढाई

हुनैनची लढाई ६३० मध्ये मक्केपासून अल-ताईफकडे जाणाऱ्या खोऱ्यात लढली गेली.
मक्केतील जवळपास सर्वांनीच व शेजारच्या काही टोळ्यांनी इस्लामचा स्वीकार केलेला असला तरी अरबस्थानात आणखी अनेक लोक मूर्तिपूजक होते. (१९-२२८) त्यातील अनेकांना मक्का विजयाने धक्का बसला होता. शिवाय, खलिदने केलेल्या हत्याकांडाने ते सावध झालेले होते. यासंबंधात सय्यद हुसेन म्हणतात: "खलिदने बनी जझीम टोळीसंबंधात केलेल्या क्रूर वर्तणुकीचा, ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही अशा इतर अरब टोळ्यांवर असा वाईट परिणाम झाला की, बनी हावजिन व इतर अनेक टोळ्या, (मुस्लिमांविरुद्ध) एकत्र आल्या. ह्या टोळ्या अगोदरच इस्लामच्या वाढत्या सामर्थ्याला संघटित विरोध करण्याचा विचार करीत होत्या.
आता (तर) त्यांना इस्लामचे आपल्यावर आक्रमण होईल, अशी भीती वाटू लागली.'' (१७-१९९) मक्केच्या आग्नेयकडे ५० मैलांवर असलेले ताईफ या शहराच्या आसपास या टोळ्यांचे क्षेत्र होते. या टोळ्या कमालीच्या मूर्तिपूजक होत्या. ताईफच्या मूर्तिपूजकांनीच ११ वर्षांपूर्वी प्रेषितांवर दगडफेक करून त्यांचे रक्त सांडले होते (मागे ११०) मक्केनंतर आता आपली पाळी आहे हे ओळखून त्यांच्यात भीती पसरली होती. (१८-१४४) या टोळ्यांत व मक्केच्या कुरैशांत पूर्वापार कडवे हाडवैर होते. (२१-२६३) त्यांनी लगेच आपल्या टोळीच्या सर्व शाखांना एकत्र जमण्याचे निमंत्रण दिले. ते सर्व निष्णात तिरंदाज म्हणून प्रसिद्ध होते. ताईफ शहराच्या ईशान्येकडील दरीत एका ठिकाणी त्यांचे प्रमुख मलिक यांच्या नेतृत्वाखाली ४००० सैनिक जमा झाले. (१७-१९९) या स्थळाला हुनैन असे म्हणतात.
या टोळ्या जमा झाल्याची बातमी कानावर येताच प्रेषितांनी मक्केतील वास्तव्य आवरते घेतले. तोपर्यंत मक्केच्या प्रशासनाची सारी व्यवस्था त्यांनी लावून दिली होती..मक्केचे प्रशासकपद (गव्हर्नर) तेथीलच २० वर्षांचे अत्तब यांच्या हाती सोपविले होते, (मागे-२२८ : १८-४२४) त्यांना वेतन देण्याची व्यवस्था करण्यात आली. (२१-२६४) मक्केचा सर्व कारभार फक्त १५ दिवसांपूर्वी मुस्लिम झालेल्या मक्केच्याच लोकांच्या हाती सोपविण्यात आला होता. मदिनेहून आलेला एकही अधिकारी (धर्म शिकविण्यासाठी धर्मतज्ज्ञ म्हणून नेमलेला मुआघ यांचा अपवाद वगळता) वा सैनिक मक्केत शिल्लक राहिला नव्हता. (२१-२६४) (२८-१०) खरोखर हाही एक चमत्कारच होता. आपला एकही नव-अनुयायी आपण मदिनेला गेल्यावरही इस्लाम सोडून जाणार नाही, तो स्वेच्छेने मदिनेतील मुस्लिमांप्रमाणेच एकनिष्ठ व कडवा मुसलमान बनून राहील यावर केवढा हा प्रगाढ विश्वास! आणि खरेच पुढे यांपैकी एकाही अनुयायाने धोका दिला नाही, इस्लामचा त्याग केला नाही ही केवढी धर्मनिष्ठा!
हा होत असलेला पराभव पाहून नुकतेच मुस्लिम झालेले मक्केचे काही नेते उपहासाने बोलू लागले. अबू सुफियान म्हणाले : 'आपला नाश होईपर्यंत आता शत्रु थांबणार नाही!' जब्ला म्हणाला : 'मुहंमदांची जादूगिरी आता संपलेली दिसते. (१७- २०२, १९-२२८) प्रेषित मात्र मुळीच घाबरले नव्हते; विचलितही झाले नव्हते; पर्वताप्रमाणे धीर धरून होते. अल्लाह हा श्रद्धावानांना मदत व विजयी करीत असतो व तो आपल्यालाही तसेच करणार यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांनी पुन्हा मोठचाने आपल्या पळणाऱ्या सैनिकांना हाक मारली. सैनिक जमू लागले. शत्रूशी दोन हात करू लागले. त्यांना उत्तेजित करताना ते म्हणाले : 'आता अग्निभट्टी भडकलेली आहे. मी प्रेषित आहे, व खोटे बोलणारा नाही. मी अल-मुत्तलिब यांच्या बिजाचा आहे!' (१९-२२९)
युद्धाला जोर चढला. मुस्लिम त्वेषाने लढू लागले. लगेच प्रेषितांनी हातात ओंजळभर वाळू घेतली व शत्रूच्या दिशेने उधळून गर्जना केली : "त्यांचा नाश होवो ! त्यांची दाणादाण उडो !' (उक्त) मुस्लिम सैन्याचा विजय होऊ लागला. लगेच प्रेषित म्हणाले : "अल्लाच्या मदतीने शत्रू हरला ! अल्लानेच त्यांच्या हृदयात भीती उत्पन्न केली. " (१८-४१७) शेवटी शत्रू हरला. मुस्लिम पक्षाचा निर्णायक विजय झाला. ही आठ वर्षापूर्वीच्या बद्र-युद्धाचीच (मागे-१५१) पुनरावृत्ती होती. अल्लाने देवदूतांचे सैन्य पाठविल्यामुळेच हा विजय मिळाला, याबद्दल प्रेषितांना खात्री होती. शत्रूचे ७०० जण ठार झाले. (१०५-३८१) त्यात काही स्त्रियांचा व मुलांचाही समावेश होता. (१७-२०३) स्त्रिया व मुले यांना न मारण्याचा प्रेषितांचा आदेश होता. तरीपण हे कृत्य एक सेनानी खलिद यांनी केलेले होते. यासाठी प्रेषितांनी खलिद यास दोष दिला. (१७-२०३) विक्रमी लूट मिळाली. त्यात २४ हजार उंट, ४० हजार शेळ्या व मेंढ्या, ४० हजार औंस चांदी यांचा मुख्यतः समावेश होता. ६ हजार लोकांना कैदी करण्यात आले. (यांत स्त्रिया व मुले यांचा समावेश होता म्हणून ही संख्या मूळ सैनिकांच्या संख्येपेक्षा अधिक होती.) मक्केच्या विजयात एका कैद्याची, एका मेंढीची किंवा एका पैशाचीही लूट मिळाली नव्हती. अल्लानेच त्याची भरपाई या हुनैन युद्धात करून दिली होती !
या विजयासंबंधी कुराणात म्हटले आहे: “अल्लाने तुम्हाला अनेक युद्धांत (मदत करून) विजय प्राप्त करून दिला. आणि हुनैनच्या दिवशी तुम्हाला तुमच्या (मोठ्या) संख्येचा गर्व आला होता; परंतु तो तुमच्या काहीही कामी आला नाही. आणि भूमी विस्तीर्ण असतानाही ती तुमच्याकरिता अरुंद (खिंड) बनली व तुम्ही पाठ फिरवून पळू लागलात. नंतर अल्लाने आपल्या प्रेषितांवर व इतर श्रद्धावानांवर विश्वासाची शांती अवतरित केली. आणि वरून (मदतीसाठी) अशा सेना पाठविल्या की, ज्या तुम्ही पाहू शकला नाहीत. आणि अल्लाने श्रद्धा न ठेवणाऱ्यांना शिक्षा केली. श्रद्धाहीनांकरिता असाच मोबदला असतो. " (९ : २५-२६)
मुस्लिम मनाचा शोध-शेषराव मोरे यांच्या पुस्तकातून (पुष्ठ क्र.२३१)
६३१ - ताबूकची लढाई...
जरी याला लढाई म्हणून संबोधले जात असले तरी ही एक लष्करी मोहीम होती ज्यामध्ये प्रेषित मुहम्मद यांच्या नेतृत्वाखालील रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम सैन्याने द्वीपकल्पाच्या उत्तर-पश्चिम भागात ताबूक शहराकडे कूच केले होते. 30,000 लोकांच्या सैन्याचे नेतृत्व स्वतः प्रेषित करत होते, त्यावेळी मुस्लिमांनी उभारलेले सर्वात मोठे सैन्य होते.
प्रेषितांना (ऑक्टो. ६३०) अशी बातमी समजली की, रोमन सम्राट हेरॉक्लिअस हा मदिनेवर आक्रमण करण्यासाठी सैन्य जमा करीत आहे. अरबस्थानातच पण रोमन साम्राज्यांतर्गत अनेक मांडलिक अरब राजे होते. अशांपैकी घस्सान, लखम, जझम द अमिल या टोळ्या प्रमुख होत्या. (२०-४१८) या टोळ्या रोमन साम्राज्याची मदत घेऊन मदिनेवर आक्रमण करणार अशी अफवा पसरली होती. अशा बातम्या कानावर आल्या की, आपणच अगोदर त्यांच्यावर चालून जायचे व रणभूमी शत्रूच्या क्षेत्रात करायची या पद्धतीनुसार प्रेषितांनी तिकडे जाण्याची तयारी सुरू केली. अनुयायांना तयार होण्याचा आदेश दिला. पल्ला खूप लांबचा होता. ७०० कि.मी. अंतरावरील ठिकाणी लढाई करण्यासाठी जावयाचे होते. (१०८-३४७) परंतु नेहमीप्रमाणे या मोहिमेवर जाण्यास लोक उत्सुक नव्हते. एकतर प्रवास खूप लांबचा होता. जाण्यासाठी २०-२२ दिवस लागणार होते.
दुसरी गोष्ट म्हणजे बलाढ्य शत्रूशी टक्कर द्यावयाची होती. एका वर्षापूर्वीच्या मुटाच्या दारुण पराभवाचा अनुभव ताजा होता. (मागे २१७) तेथे पराभवाची व लूट न मिळण्याची अधिक शक्यता होती. तिसरी गोष्ट म्हणजे नुकत्याच झालेल्या हुनैनच्या युद्धात लूट कमी मिळाल्यामुळे सैनिकांत नाराजी होती. (२०-४१९) चौथी गोष्ट म्हणजे ते सुगीचे दिवस होते. शेतातील पिके तयार झालेली होती; कापणीला आली होती. पाचवी गोष्ट म्हणजे त्या वेळेस उन्हाळा कडक असल्यामुळे अरबस्थान भाजून निघत होता. या सर्व कारणांमुळे येण्यासाठी अनेकजण अनेक सबबी सांगू लागले. मदिनेतील लोकांपैकी अनेकांना अशी सवलत देण्यात आली. परंतु मक्कावासीयांना व इतर अरब टोळ्यांना ती सवलत देण्यात आली नाही. (१८-४४०: १२९-४१: ३०-५२)
दुसरा उपहासाने म्हणाला : "या (मोहिमेवर चाललेल्या) माणसाकडे पहा! हा रोमन व सिरियन किल्ले जिंकण्यास निघाला आहे !" (११७-२२८) याच मोहिमेत प्रेषितांचा उंट चरत असताना चुकून कुठेतरी निघून गेला. तो शोधूनही सापडेना. तेव्हा काही अनुयायी म्हणू लागले : " (या माणसाकडे पहा !) तो स्वर्गाच्या. वार्ता सांगीत असतो, पण स्वतःचा उंट कुठे आहे ते सांगू शकत नाही.' (११७-२३४) असे असतानाही प्रेषितांच्या नेतृत्वाखाली ३० हजारांची फौज तयार झाली. त्यात १० हजार घोडेस्वार होते.
गतवर्षी अशाच मुटा-युद्धाच्या वेळी (मागे-२१७) फक्त ३ हजारांचे सैन्य गेले होते. आता एका वर्षातच ती संख्या दहापट झालेली होती. सहा वर्षांपूर्वीच्या बद्रयुद्धापेक्षा तर ही संख्या शंभरपट होती. मक्का - विजयानंतरच्या प्रेषितांच्या वाढलेल्या सामर्थ्याचा हा निदर्शक होता. ही मोहीम मात्र नेहमीप्रमाणे आडमार्गाने, गुपितपणे व अचानक हल्ला करण्यासाठी न जाता स्पष्टपणे जाहीर करून निघालेली होती. (२१-२७५: १०८-३५२) मदिनेतील असंतुष्टांचे नेते अब्दुल्ला उबय आपली फौज घेऊन त्यांच्यासोबत निघाले होते. पण लगेच ते परत फिरले. प्रेषितांनी त्यांना परत पाठविले असे म्हटले जाते. (१८-४४०, ४०-४१९)
उहूद-युद्धाच्या वेळेस असेच घडलेले होते. (मागे-१६९) या मोहिमेसाठी सर्व नागरिकांनी उदार मनाने भरपूर आर्थिक मदत केलेली होती. (३०-५२) शेवटी, हे सैन्य सिरिया सरहद्दीवरील त्या शत्रू टोळ्या अपेक्षित असलेल्या तबूक या ठिकाणी जाऊन पोहचले. पण त्यावेळेस लक्षात आले की, तेथील टोळ्या आपल्यावर आक्रमण करणार आहेत ही केवळ अफवा होती. तेथे लढण्यासाठी शत्रूच नव्हता. ४५ (२०-४२१: ९-१०४) असे हे 'तबूकचे न झालेले युद्ध' होय.
-मुस्लिम मनाचा शोध-शेषराव मोरे यांच्या पुस्तकातून (पुष्ठ क्र. २४२)
६५३ -रोड्सवर विजय
६५३ मध्ये, मुस्लिम सेनापती मुआविया I च्या नेतृत्वाखाली अरब सैन्याने रोड्सवर विजय मिळवला आणि क्रोनिकल ऑफ थियोफेनेस द कन्फेसर नुसार, शहर पूर्णपणे बेचिराख करून टाकले. आजच्या ग्रीस देशाच्या बेटांच्या समूहापैकी असलेले रोड्स त्याकाळी रोमन साम्राज्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असे. अशा रितीने रमजानच्या पवित्र महिन्यात नृशंस रक्तपात करून इस्लामने यूरोपात आपले पाऊल टाकले.
रमजानचा १९ वा दिवस! इमाम अली हे इस्लामचे महान तत्त्वज्ञ,पैगंबर मुहम्मद यांचे चुलत भाऊ आणि जावई देखील होते त्यांची रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये हत्या झाली होते.
हिजरी च्या ४० व्या (६६१) वर्षी, रमजानच्या १९ व्या दिवशी पहाटे इराकच्या कुफा शहरातील मशिदीमध्ये पहाटेच्या वेळी नमाज अदा करत असताना इमाम अली यांच्या डोक्यावर खवारीज नावाच्या एका विषारी तलवारीने अब्दुल-रहमान इब्न मुलाजम या मारेकऱ्याने वार केले. हा मारेकरी इमाम अलीच्या मागे उभा होता आणि नमाजाच्या वेळी त्याच्या मागे येत असल्याचे भासवत होता परंतु प्रत्यक्षात तो इमाम अलीच्या हत्येसाठीच आला होता. हल्ला झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी इमाम अली यांचा डोक्याला जबर दुखापत झाल्याने मृत्यू झाला, तो रमजानचा २१वा दिवस होता.
[संदर्भ: - The Conquest of Spain by Prof. Nazeer Ahmed]
१०९९ - एस्कालॉनची लढाई.
तब्बल ८८ वर्षांपूर्वी (४९२ हिजरा) मध्ये जेव्हा पुन्हा ख्रिश्चनांनी जेरुसलेमचा ताबा घेतला आणि ७०,००० हून अधिक मुस्लिमांची हत्या केली.तथापि, त्या वेळी बगदादमधील खलिफाकडून मुसलमानांना प्रतिसाद मिळाला नाही. ख्रिश्चनांना हे साध्य करता आले कारण मुस्लिम अंतर्गत लढाई आणि वादांमुळे कमकुवत झाले होते.
त्या काळात इजिप्तवर शिया फातिमी साम्राज्याचे राज्य होते. काही वेळा, या साम्राज्याने इतर मुस्लिमांच्या हानीसाठी ख्रिश्चनांना सहकार्य केले. तथापि, फातिमी साम्राज्य देखील खूप कमकुवत झाले होते आणि ख्रिश्चनांनी इजिप्तवर आक्रमण करून ते जिंकण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
अलेप्पो आणि मोसुलचा अमीर नूर-अद-दीन झेंगी, जो त्यावेळी एकापाठोपाठ एक शहर पुन्हा ताब्यात घेणाऱ्या ख्रिश्चनांच्या विरोधात उभा होता, त्याने इजिप्तमधील मुस्लिमांना पाठिंबा देण्यासाठी आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.सेनाप्रमुख शिरकुह याने पुतण्या सलाहुद्दीनला सोबत घेतले. सैन्याने इजिप्तमध्ये ख्रिश्चनांचा पराभव केला, शिरकुहचा पोटाच्या आजाराने मृत्यू झाला आणि सलाहुद्दीन इजिप्तचा सेनाप्रमुख झाला.
सलाउद्दीनने ख्रिश्चनांवर हल्ल्याची तयारी करण्यासाठी मुस्लिम एकत्र करवले. काही वर्षे लागली, परंतु लवकरच सलाहुद्दीनकडे पवित्र भूमीला ख्रिश्चनांपासून मुक्त करण्यासाठी एक विशाल सैन्य तयार झाले. 88 वर्षांनंतर, (582 हिजरा) 1099 च्या रमजानमध्ये प्रचंड रक्तपात करून जेरुसलेम ख्रिश्चनांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आले.
हॅटिनची लढाई ही पवित्र रमजान महिन्यात लैलात उल-कद्र (शब-ए-क़द्र=रमजान महिन्याचा २७ वा दिवस ) किंवा "नियतीची रात्र" नंतर - पहाटेच्या वेळी लढली गेली . सुलतान सलादिन याने फ्रँकिश सैन्याचा नाश केला आणि इस्लामसाठी जेरुसलेमवर पुन्हा दावा केला. ही लढाई पवित्र रमजान महिन्यात 4 जुलै रोजी झाली.
१२६० - ऐन जलूतची (पॅलेस्टाईन) लढाई. ३ सप्टेंबर १२६० रोजी रमजानमध्ये प्रचंड रक्तपात झाला, विशेष म्हणजे दोन्ही बाजूने वेगवगळ्या पंथाचे मुस्लिमच लढत होते.
‘ऐन जलूत’च्या लढाईमुळे मंगोल साम्राज्याचा अस्त झाला...
कुख्यात चंगेज खानच्या काळानंतर मंगोल हे जगातील सर्वात भीतीदायक आणि दहशत निर्माण करणारे अत्याधुनिक शक्तींपैकी एक होते. त्यांच्या घोडदळ धनुर्धारी आणि वेगवान छाप्यांसह, त्यांनी त्यांच्या मार्गात त्यांच्या विरुद्ध उभे असलेल्या कोणालाही नष्ट केले. चंगेज खानचे स्वप्न संपूर्ण जगाचा सम्राट बनणे हे होते. अलेक्झांडर आणि चंगेझ खान यांचे हे समान लक्ष्य होते. चंगेज खानचा नातू मोंगके खान १२५१ साली ग्रेट खान बनला आणि त्याने आपल्या महान आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत जग जिंकण्याची योजना आखली.
मुंगके खानचा भाऊ हुलागु खानवर पश्चिमेकडील राज्यांना वश करण्याचा आरोप ठेवण्यात आला. १२६० पर्यंत त्याने एकतर सिलिशियन आर्मेनियन, अँटिओक आणि बगदादमधील ५०० वर्ष जुने पद ‘अब्बासीद खलीफा’ पूर्णपणे नष्ट केले किंवा वश केले होते. जेरुसलेममधून जाण्याची आणि जगातील शेवटच्या प्रमुख इस्लामी शक्तीला, मामलुक सल्तनतीला सामोरे जाण्याची त्याची योजना होती.
१२६० साली त्याने कैरोमधील कुतुझ-द-मामलुककडे विविध धमक्यांच्या पत्रांसह राजदूत पाठवले. त्या पत्रांचा मजकूर होता, “आम्ही विस्तीर्ण क्षेत्रे जिंकली आहेत, सर्व लोकांची हत्या केली आहे… कोणतेही किल्लेदार आम्हाला ताब्यात घेणार नाहीत, किंवा सैन्य आम्हाला रोखणार नाही.. आम्ही तुमच्या मशिदी तोडणार आहोत… तुमची मुले आणि म्हातारे एकत्र मारू…” कुतुझनेही राजदूतांचा शिरच्छेद करून आणि कैरोच्या वेशीवर त्यांचे डोके टांगून या पत्राला प्रतिसाद दिला.
पण, ग्रेट खान चीनच्या मोहिमेत मरण पावला तेव्हा आक्रमणाची दिशा बदलली गेली आणि पुढचा ग्रेट खान कोण असेल हे ठरवण्यासाठी हुलागुला मायदेशी परतावे लागले. जाताना त्या भागात मंगोल लोकांची उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी त्याने फक्त एक छोटे सैन्य ठेवले. संधी पाहून, कुतुझ मामलुकने पॅलेस्टाईनवर आक्रमण केले आणि इस्लामचे रक्षण करण्यासाठी आणि मंगोलांच्या ताब्यातील दमास्कस आणि बिलाद अल-शामच्या बहुतेक भागांना मुक्त करण्यासाठी एक साथी मामलुक नेता, बायबरसह युती केली.
मामलुकांची वाढती लष्करी ताकद पाहून, मंगोल लोकांनी फ्रँको-मंगोल युती आणण्याचा प्रयत्न केला पण ‘पोप अलेक्झांडर फोर्थ’ने त्यास मनाई केल्याने ते अयशस्वी झाले. वैकल्पिकरित्या, जरी इस्लामविरूद्ध मामलुक आणि फ्रँक यांच्यात दीर्घकाळ ख्रिस्ती लढत असले तरी फ्रँक्सला समजले की मंगोलियन सैन्य कोणालाही सोडणार नाही आणि अशा प्रकारे त्यांनी मामलुक सैन्याला त्याने त्यांच्या भूमीतून जाऊ दिले.
जेव्हा मंगोल लोकांनी जॉर्डन नदी ओलांडल्याची बातमी आली, तेव्हा कुतुझ त्यांना भिडण्यासाठी जेझरील खोऱ्यात ‘ऐन जलूत’च्या दिशेने निघाला.
३ सप्टेंबर १२६० रोजी ‘ऐन जलूत’मध्ये दोन्ही बाजूंनी प्रत्येकी वीस हजार सैनिकांची लढाई झाली. मंगोल लोकांनी पहिला हल्ला केला. मामलुकांना मोठा फायदा होता कारण त्यांना त्या भूप्रदेशाची अत्यंत अचूक माहिती होती आणि कुतुझने याच गोष्टीचा उपयोग आपल्या विजयासाठी केला.
रणनीती प्रत्यक्षात बायबरने मांडली होती कारण त्याने या प्रदेशात सर्वाधिक वेळ घालवला होता. कुतुझने आपले बहुतेक सैन्य डोंगराळ प्रदेशात लपवून ठेवले आणि बायबरने खुल्या मैदानात मंगोल लोकांशी लढण्याचा प्रयत्न केला.
लढाई तासनतास चालली, दोन्ही बाजूंपैकी कोणालाही फायदा मिळाला नाही. बायबरने शेवटी युद्धातून माघार घेण्याचे नाटक केले. संतप्त झालेल्या मंगोल कमांडरने मात्र निष्काळजीपणे मागे हटणाऱ्या सैन्याचा पाठलाग केला. जेव्हा हे सैन्य शेवटी डोंगराळ प्रदेशात पोहचले, तेव्हा कुतुझच्या सैन्याने मंगोलनांना वेढा घातला आणि मंगोल अचानक मामलुक सैन्याच्या वेढ्यात अडकले. मंगोल मात्र निःशस्त्र आणि फक्त हातांनी लढाई करण्यास अगतिक झाले. या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी ते आपल्या जीवाची बाजी लावून लढले. काही ठिकाणी मंगोल यशस्वी झाले सुद्धा.
मंगोल लोक डाव्या फळीतून बाहेर पडत आहेत हे पाहिल्यावर कुतुझने आणखी सैन्याला युद्धात उतरवले आणि तेथे असलेल्या मंगोल सैन्याला चिरडले. जरी मंगोल सैन्य पलटवार करण्यात यशस्वी झाले तरी त्यांच्याकडे पुरेशी सैन्य-संख्या नव्हती आणि लवकरच त्यांच्या कमांडरसह संपूर्ण मंगोल सैन्य पूर्णपणे नष्ट झाले. समोरासमोरच्या प्रत्यक्ष लढाईत मंगोल सैन्याला पहिल्यांदाच कोणत्या सैन्याने पराभूत केले होते.
या ऐतिहासिक विजयाच्या नंतर मात्र, कुतुझची हत्या बायबरच्याच काही गुप्तहेरांनी केली. यानंतर बायबर एकमेव मामलुक शासक बनल्यानंतर त्याने पुन्हा मंगोल लोकांविरुद्ध युद्ध पुकारले आणि त्यात त्यांना पराभूत केले. तसेच बायबरने उर्वरित क्रुसेडर साम्राज्यांवरही सत्ता मिळवली आणि एक मजबूत साम्राज्य उभे केले.
उत्तराधिकारांच्या मुद्यांमुळे, हुलागुला मामलुकांच्या हातून पराभवाचा बदला घेण्याइतपत मजबूत शक्ती गोळा करता आली नाही. शिवाय, मंगोल लोकांमध्ये अंतर्गत भांडणे चालू होती, कारण किपचक खानतेचा खान मुस्लिम झाला होता आणि हुलागूने अब्बासींचे काय केले हे ऐकल्यावर त्याने हुलागुला खालील संदेश पाठवला, ““त्याने (हुलागुने) मुस्लिमांची सर्व शहरे उध्वस्त केली आहेत आणि खलिफाचा मृत्यू घडवून आणला आहे. ईश्वराच्या मदतीने मी त्याला इतक्या निष्पाप लोकांच्या हत्येचा हिशोब देईन. ”
अखेरीस मामलुकांच्या हातून झालेल्या पराभवामुळे मंगोल साम्राज्याचा अंत झाला. कुबलाई खान साम्राज्याचा शेवटचा ग्रेट खान होता. मंगोल किपचकांविरूद्ध लढत होते आणि 1263 साली कॉकसच्या हल्ल्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
जरी मामलुकांशी लढण्यासाठी पुढील सैन्य पाठवले गेले असले तरी ते देखील ते सैन्य मामलुकांच्या प्रदेशाला इस्लामिक साम्राज्याखाली आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरले. यामुळे शेवटी मंगोल लोकांमुळे जगात पसरलेल्या व्यापक दहशतीचा अंत झाला आणि पुन्हा एकदा जगात स्थिरता बहाल झाली.
म्हणूनच ऐन जलूतची लढाई जगाच्या इतिहासातील एक महत्वाची ऐतिहासिक घटना होती.
केशवदेव राय मंदिर:-
-मथुरेतील केशवदेव राय मंदिर देशातील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक होते आणि स्थापत्य कलेतही त्याला अन्यनसाधारण महत्व होते. हे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधले गेले होते, श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी परदेशातून लोक येत असत, शाहजहानचा मुलगा दारा शिकोह याने मंदिरासमोर एक कोरीव दगडी रेलिंग बसवली होती, जे ऑक्टोबर १६६६ मध्ये औरंगजेबाने काढून टाकले होते. दारा शिकोहला मारल्यानंतर औरंगजेबाने हे संपूर्ण केशवदेव राय मंदिर रमजानच्या महिन्यात ११ फेब्रुवारी १६७० रोजी रमजान महिन्यात तोडले होते.त्याची विशालता अथवा भव्यतेचा अंदाज यावरून लावता येतो की तो पूर्णपणे तोडायला ३ दिवस लागले!
https://harshad30.wordpress.com/2014/07/18/
रमजान दरम्यान युद्धाची ऐतिहासिक प्रकरणे..
१९४८ च्या अरब राष्ट्रे आणि इस्रायलच्या नवीन राज्यामध्ये दोन रमजानमध्ये (2 वर्षे) घनघोर लढाई झाली.
१९६२ ते १९७० या काळात येमेनी गृहयुद्धादरम्यान नऊ रमजानपर्यंत (९ वर्षे) लढाई सुरू राहिली.
लेबनॉनच्या १९७५ ते १९९० च्या गृहयुद्धादरम्यान, सतरा रमजानच्या (तब्बल 17 वर्षे) काळात लढाई झाली. १९८६ मध्ये, ख्रिश्चन सैन्याने रमजान युद्धविराम पुकारला, जो फक्त दोन आठवडे चालला.
१९७३ मध्ये, इजिप्शियन आणि सीरियन लोकांनी इस्रायलवर युद्ध केले ज्याला हार्ब रमजान किंवा "रमजान युद्ध” म्हणतात.
अफगाणिस्तानात १९७९ ते १९८९ या काळात मुजाहिदीन नऊ रमजान (९ वर्षे) सोव्हिएत संघाविरुद्ध लढले. एप्रिल १९८९ मध्ये, सोव्हिएट्सने रमजान युद्धविराम देऊ केला; ही परंतु ऑफर शांतीप्रिय मुसलमानांकडून नाकारण्यात आली.
इराण आणि इराकमध्ये १९८० ते १९८८ पर्यंत आठ रमजानच्या (८ वर्षे) काळात लढाई झाली. खरं तर, १९८१ मध्ये शिया इराणने सुन्नी इराकला देऊ केलेला रमजान युद्धविराम इराकने नाकारला होता. युद्धाच्या तिसऱ्या वर्षाची सुरुवात इराणी लोकांनी रमजान मुबारकने केली. मे १९८७ मध्ये, इराकने पुन्हा रमजान युद्धविराम प्रस्ताव सादर केला, तो शिया इराणने पुन्हा नाकारला.
पहिला पॅलेस्टिनी इंतिफादा (बगावत), १९८७ ते १९९३ पर्यंत चाललेला संघर्ष, सहा रमजानमध्ये (६ वर्षे) चालवला गेला.
१९९५, १९९७ आणि १९९८ मध्ये, सशस्त्र इस्लामिक गटाने विशेषतः रमजानच्या काळात अल्जेरियन सरकारवर हल्ले वाढवण्याचे आदेश दिले. रमजान १९९७ मध्ये, सशस्त्र इस्लामिक गटाने अल्जेरियन पीडितांना पकडले, नंतर शिक्षा म्हणून या "इस्लामच्या शत्रूंच्या" तोंडात वृत्तपत्रे कोंबून पेपर कटिंग मशीन मध्ये टाकून देण्यात आले... आणि हे सगळे अघोरी,विकृत, मानवतेला काळिमा फासणारे प्रकार प्रेमाचा ,शांतीचा महिना असलेल्या रमजानमध्ये सुरु होते.
पॅलेस्टिनमधील सध्याची अल-अक्सा इंतिफादा (विद्रोह) रमजान २००० साली सुरू झाला आणि या वर्षीच्या पवित्र रमजान महिन्यातही तो संघर्ष कायम राहण्याची अपेक्षा आहे.
२००० साली सुरु झालेला नाटो-अफगाणिस्तान संघर्ष तब्बल २१ वर्षांनी संपला. यामध्ये देखील अनेक रमजान आले आणि गेले परंतु रक्तरंजित युद्ध मात्र जोरदार सुरु होते .
२०००- भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीरमधील शांततेच्या दिशेने पाऊल म्हणून रमजानच्या पवित्र महिन्याचे पालन करण्यासाठी भारत एकतर्फी युद्धविराम करेल असे सांगितले. परंतु इस्लामिक रिपब्लिक पाकिस्तानच्या 'हरकत-उल-मुजाहिद्दिन' या धर्मांध,जिहादी संघटनेने घोषणा केली की, "रमझान महिन्याच्या १७ व्या दिवशी 'बद्रची लढाई' झालेली होती. या लढाईच्या दिवशी आम्ही भारतीय लष्करावर व्यापक प्रमाणावर हल्ले करण्याची योजना आखली आहे." आणि रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर गोळीबार चालूच ठेवला म्हणून लढाई सुरूच होती. (सकाळ, दि. २२-११-२०००)
https://www.washingtoninstitute.org/policy-analysis/us-military-operations-and-question-ramadan
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आधुनिक इतिहासात आतापर्यंत प्रस्तावित केलेले केवळ 4 वेळा रमजान युद्धविराम करण्याचे प्रयत्न झाले. इराक, USSR आणि लेबनॉनमधील ख्रिश्चन,भारतीय सैन्याने सुचवले होते. पण वस्तुस्थिती अशी आहे की, पवित्र रमजानमध्ये शान्तिप्रिय मुस्लिमांकडून युद्ध विराम होऊ शकला नाही.
2014 - ISIS या प्रचंड रक्तपात करून जगावर धर्मांध, जिहादी, क्रूर इस्लामी राजवट आणू पाहणाऱ्या संघटनेचा जन्म देखील पवित्र रमजान महिन्यातच झाला. (June 2014)
https://www.wilsoncenter.org/article/timeline-the-rise-spread-and-fall-the-islamic-state
हमीद दलवाई आणि काही भारतीय मुस्लिमांशी झालेली पुढील चर्चा उल्लेखनीय आहे त्यांना एकजण म्हणाला:- ''हम इस मुल्कके मालिक थे! आप (हमीद दलवाईंना हिंदूच्या बाजूचे समजून) हम को गुलाम बनाना चाहते है?' यावर दलवाईंनी विचारले 'मग यावर तुमचा मार्ग कोणता?' त्याने उत्तर दिले : 'मुकाबला! हिंदुओंसे मुकाबला! हम और भी मुकाबला कर सकते है!' दलवाईंनी विचारलेः 'मग का करीत नाही?' त्याने उत्तर दिले: 'आप हमारा साथ दीजिये! सब मुसलमान इकठ्ठे हो गये तो यूं हिंदूओंको हरा देंगे! मुसलमान अपने इमानसे भारी से भारी दुष्मनों को भी शिकस्त दे सकते है! यह इस्लामकी तवारीख है! बदरके लढाईका इतिहास जरा ख्याल कीजिये!" (१२१-३०) मुस्लिम मनाचे एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून त्यांनी हा संवाद उद्धृत केला आहे.
-मुस्लिम मनाचा शोध-शेषराव मोरे यांच्या पुस्तकातून (पुष्ठ क्र. १५८)
🚀 Coming Soon
We’re building something amazing.
- Fandom: Battles Fought During Ramadan by Muslims
- Teller Report: Top 10 Islamic Conquests and Battles in Ramadan
- Muslim Ink: Muslim Battles During Ramadan
- Destination KSA: Historic Battles Fought in Ramadan
- Washington Institute: US Military Operations and Ramadan
- The Postman: Battle of Ain Jalut (in Marathi)