कुदळवाडी आणि जर्मन बेकरी ब्लास्ट चा मास्टरमाईंड यासिन भटकळचा संबंध काय?

Known Connections

कुदळवाडी आणि जर्मन बेकरी ब्लास्ट चा मास्टरमाईंड यासिन भटकळचा संबंध काय?

Known Connections

Background



Introductory Memo

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांच्या कानावर पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी या भागाचे नाव नक्कीच पडले असेल. साधारणतः ८२५ एकर परिसरात पसरलेल्या या भागात अनधिकृत बांधकाम, भंगार व्यवसाय आणि अवैध धंद्यांचं साम्राज्य होतं. पिंपरी-चिंचवड महानगरपालिके ने कारवाईचा बडगा उगारून चार हजारापेक्षा अधिक अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवला आहे.

अचानक सुरू झालेल्या या व्यापक कारवाईमुळे गोंधळलेल्या विरोधी पक्ष नेत्यांनी आता सूत्रबद्ध पद्धतीने आक्रोश करण्यास आणि सरकारवर आरोप लावण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवून, या कारवाईमुळे “एक लाख लोकांचा रोजगार बुडाला; १,००० कोटींची उलाढाल थांबली आहे”, असे खोटा प्रचार करून कुदळवाडी मध्ये निर्माण झालेल्या ‘मिनी पाकिस्तानचे’ सत्य लपवण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.

माहिती साठी हि तीच कुदळवाडी आहे जेथे कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ ने पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट आणि २०१२ ला जंगली महाराज मार्गावर झालेल्या स्फोटाचे योजना आखली होती.

याच संदर्भात कुदळवाडी प्रकरण नेमकं काय आहे? आणि या कारवाईमुळे विरोधी पक्षांना कशाप्रकारे वेदना होऊ लागल्या आहेत? चला, त्याच्या मुळापर्यंत जाऊन सविस्तर समजून घेऊयात."

1. News at Glance
2. Analytical View

कट्टरपंथीय समाज ज्या ठिकाणी एकत्र येतो तिथली संख्याशास्त्रीय गणित (डेमोग्राफी) बदलते. अशा धार्मिक लोकसंख्येतील बदलांचे विविध परिणाम होऊ शकतात, विशेषेश करून समाजातील तेढ वाढविणे, विविध धार्मिक गटांमध्ये तणाव आणि शत्रुत्व निर्माण करणे. यामुळे सामाजिक ऐक्य कमी होऊ शकते आणि असहिष्णुतेला वाव मिळू शकतो. धार्मिक लोकसंख्येतील बदल धार्मिक संघर्ष, दंगली निर्माण करू शकतात. आणि अशा घटनांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कुदळवाडी.

कुदळवाडीचा इतिहास

१९९७ पासून चिखली-कुदळवाडी परिसर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाला. त्यापूर्वी पासून भंगार व्यावसायिकांनी या भागात दुकाने थाटली होती. आधीछोट्या स्वरूपामध्ये रद्दी, भंगार, अशा व्यवसायाची दुकाने उभारली गेले. कालांतराने हळू-हळू तिथे छोटे कारखाने उभारले गेले. काही ठिकाणी तर अवैध गोडाऊन, शेड बांधली. पक्की बांधकाम असलेल्या तीन-चार मजली अवैध इमारती येथे) दिसून आली.

या बांधकामांना पाणी आणि वीज कनेक्शन कोणी दिले? त्या वेळी कोणाचे सरकार होते? याचा शोध खरं तर शासनाने करावा.

२००१ ते २०२४ पर्यंतचे जर आपण ‘सॅटेलाईट’ दृश्य बघितली तर, आपल्याला लक्षात येते की, कुदळवाडी मध्ये कशा प्रकारेअनधिकृत बांधकाम आणि तेथील जागेवरती अतिक्रमण करण्यात आले होते.

 


महापालिकेत समाविष्ट होऊन ३० वर्षे होत आली. मात्र, अद्याप चिखली-कुदळवाडीतील आरक्षणांचा विकास, डीपी रस्ते प्रलंबित आहेत. वाहतूक कोंडी आणि सोसायटीधारकांना होणार त्रास हा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. चिखली- कुदळवाडीची ओळख ‘भंगार हब’ झालेली होते. या परिसरातून इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी प्रदूषणाचे प्रमुख कारण होते . अनधिकृत बांधकाम आणि बेकायदा भंगार दुकानांमुळे पायाभूत सोयी-सुविधांवर ताण येतो होता. वीज चोरी, टॅक्स बुडवणे, पाणी चोरी या प्रकारांना खतपाणी मिळत होते.

अतिक्रमण हटवण्याची मागणी नवीन नाही

१९९७ साली सुद्धा अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा भंगार दुकांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र तेथे कोणतीच कारवाई झाली नाही आणि अतिक्रमणे तशीच राहिली. सुरूवातीला महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे अतिक्रमण आणि विकास आराखड्यातील आरक्षणावर झालेले अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत कारवाई सुरू केली. सदर कारवाईला जमाव करुन विरोध आणि रास्ता रोको करण्यात आला.

आंदोलन आणि विशिष्ट समाजाच्या व्यक्तींकडून प्रक्षोभक विधानांमुळे अतिक्रमण कारवाई हा विषय कायदा-सुव्यवस्थेचा झाला. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाला नमते घ्यावे लागले. सदर कारवाईला सात दिवसांची स्थगिती देण्यात आली. या काळात मालमत्ताधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. मात्र, अतिक्रमण काढून न घेता प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची भूमिका काही विशिष्ट समाजाने घेतली.

माहितीसाठी या जागेवर झालेले अतिक्रम काढण्यात यावे या विषयी अनेक लेख अनेक वृत्तपरमध्ये छापून आले आहेत. गमतीशीर बाद म्हणजे तीच वृत्तपत्र आता शासनावरती उलटे आरोप करत आहेत. यालाच दुतोंडी पण असे म्हणतात.
 

 
 
गेल्या १४ वर्षांत चिखली-कुदळवाडीमध्ये एक हजारापेक्षा अधिक (१,०७१) आगीच्या घटनांची नोंद झाली आहे.

कुदळवाडी एक दहशतवादी अड्डा

शासकीय आणि खाजगी जमिनीवर अवैधरित्या केल्या गेलेल्या बांधकामांना तीस वर्षांचा कालखंड वेग-वेगळ्या टप्प्यांची साक्ष देत असला, तरी मागील काही वर्षांमध्ये अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा बस्तान बसवण्याचे ठिकाण म्हणून हा भाग नावारूपाला आला होता.

एका पोलीस सूत्राने सांगितल्या नुसार कुदळवाडी इथे भंगार विक्रेते व गाड्यांचे जुने सुटे भाग विक्रेते बहुतांशी बांग्लादेशी आहेत. कुदळवाडी-चिखलीच्या ह्या भागात सध्या १७ मशिदी आहेत. त्यातील बहुतांश मशिदी अनधिकृत आहेत.
 
 

बांगलादेशी आणि (घुसखोरांसह) रोहिंग्या घुसखोर्यांमुळे हा परिसर लव्ह जिहादचे केंद्र बनला होता. परदेशातून त्यांना आर्थिक मदत मिळत होती, त्यामुळे त्यातील अनेकांकडे चांगल्या गाड्या होत्या. ते आकर्षक कपडे घालून पुण्यातील विविध महाविद्यालयांच्या परिसरात फिरत होते आणि मुलींना “लव्ह जिहादच्या” जाळ्यात अडकवण्यासाठी प्रयत्न करत होते.
 




तसेच, हा परिसर अंमली पदार्थांच्या व्यवसायाचा अड्डा बनला होता. येथून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली अंमली पदार्थांचा (ड्रग्ज) पुरवठा केला जात होता. याशिवाय, या समुदायातील काही प्रभावशाली व्यक्ती परिसरात फिरून धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

माहितीसाठी, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट आणि २०१२ ला जंगली महाराज मार्गावरझालेल्या स्फोट प्रकरणामध्ये तपास करताना पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीचे नाव समोर आले होते. या ठिकाणी कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ त्याच्या इतर दहशतवादी सहकार्यांना भेटला होता असेही समोर आले.


एकंदरीतच काय, कुदळवाडी चे रूपांतर हे दहशतवादी अड्ड्यामध्ये झाले होते. ते रोहिंग्यांचे घरच झाले होते. आणि अशा कारवाईमुळेच विरोधकांच्या पोटात दुखत आहे.

चुकीच्या कामांना प्रतिबंध करण्यासाठी झालेल्या कारवाईमध्ये काही गोरगरिबांचा रोजगार हिरावला आहे, ही सत्यता असली तरी शहराच्या भविष्याचा विचार करता बेकायदेशीर भंगार दुकान आणि चुकीच्या कामांना आळा घालणे, अनिवार्य आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. काल-परवापर्यंत ज्यांनी अतिक्रमण, भंगार दुकाने आणि बेकायदा कृत्यांमुळे शहराची, तसेच चिखली- कुदळवाडीची बदनामी होते, असा नारा देणारी मंडळी आज कारवाईच्या विरोधात धार्मिक रंग देणे आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याची भूमिका मांडत आहेत, हे खरोखरच दुर्दैवी आहे.

शेवटी एकच म्हणता येईल, “कुदळवाडी तो झाकी है, पुरा महाराष्ट्र भी बाकी है!”

3. By The Numbers

🚀 Coming Soon

We’re building something amazing.

4. Academic Insight

🚀 Coming Soon

We’re building something amazing.

5. Social Media Pulse
6. On Our Reading List

🚀 Coming Soon

We’re building something amazing.


Known Connections

Infopack

Show More

Individual

Show More

Organisation

Show More

Narratives

Show More

Activism

Show More

Propagation Medium Used

Show More
Show Connections